एसएफआयच्या तालुकाध्यक्षपदी समीक्षा केदारी यांची निवड

एसएफआयच्या तालुकाध्यक्षपदी 
समीक्षा केदारी यांची निवड
Published on

घोडेगाव, ता. २६ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) १४ व्या तालुका अधिवेशनात १५ सदस्यांची नवीन समिती निवडण्यात आली. यामध्ये समीक्षा केदारी यांची अध्यक्ष, तर रोहिदास फलके यांची सचिव म्हणून एकमताने निवड झाली.
हे अधिवेशन उद्‍घाटन, प्रतिनिधी सत्र आणि समिती निवड अशा तीन टप्प्यांत पार पडले. वन अधिकारी रईस मोमीन यांनी ‘आजची शैक्षणिक परिस्थिती व विद्यार्थी चळवळ’, यावर मार्गदर्शन केले. यावेळी माकपचे तालुका सचिव अशोक पेकारी, किसान सभेचे राजू घोडे, दीपक वालकोळी व समीर गारे उपस्थित होते. अधिवेशनात वार्षिक अहवालावर चर्चा करून पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद शाळा वाचवणे, आश्रमशाळांची गुणवत्ता सुधारणे, शिक्षणाचे बाजारीकरण रोखणे, व्यसनाधीनता आणि शून्य शुल्क प्रवेश योजनेची अंमलबजावणी यांबाबतचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. नवीन समितीत उपाध्यक्ष आशिष वागळे, कोषाध्यक्ष मयूर हिले, सहसचिव प्रियांका गोडे, कायम निमंत्रित सचिव मंडळ सदस्य यश गभाले व सदस्य आकाश खामकर, सृष्टी लोखंडे, पवन वायळ, मोनिका धिंदळे, वैष्णवी बुरसे, कुणाल दाभाडे, अभिषेक काळे, तेजल पारधी यांची तालुका समितीचे पदाधिकारी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com