माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान

माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान

Published on

गुळूंचे, ता. ८ : आषाढी एकादशीनंतर निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासात शुक्रवारी (ता. ७) सातारा जिल्ह्यातील पाडेगाव (ता. फलटण) येथील शेवटचा मुक्काम आटोपून शनिवारी (ता. ८) सकाळी ८ च्या सुमारास पुणे जिल्ह्यात दाखल झाला.
फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका विश्वस्त योगेश देसाई, राजाभाऊ आरफळकर चोपदार यांच्याकडे स्नानासाठी देण्यात आल्या. ‘ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या’ जयघोषात नीरा (ता. पुरंदर) येथील दत्तघाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.
पाडेगाव येथून सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास नीरा नदीकाठावरील दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले. सकाळी ९.३० च्या सुमारास पालखी सोहळा उत्साहात नीरा नगरीत दाखल झाला. पालखी सोहळा नीरा नगरीतील विठ्ठल मंदिरात विसावला. या वेळी उपसरपंच राजेश काकडे, लक्ष्मण चव्हाण, मदन चव्हाण, विजय शिंदे, सुदाम बंडगर, दयानंद चव्हाण, उत्तम घुले उपस्थित होते.
माऊलींच्या पादुका रथातून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या वेळी दर्शन घेण्यासाठी नीरा, गुळुंचे, निंबूत, कर्नलवाडी तसेच परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. रांगा लावून माऊलींच्या पादुकांचे भाविकांनी दर्शन घेतले.
यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याच्या वतीने दिंडीतले विणेकरी, टाळकरी तसेच वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. त्यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरषोत्तम जगताप, संचालक लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे उपस्थित होते. माऊलींचा पालखी सोहळा वाल्मीकीनगरी वाल्हेकडे मुक्कामासाठी दुपारी दीडच्या सुमारास मार्गस्थ झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.