नीरा येथे टाळ मृदंगाचा गजर

नीरा येथे टाळ मृदंगाचा गजर

गुळुंचे, ता. ६ : नीरा भिवरा पडता दृष्टी । स्नान करिता शुद्ध सृष्टी। अंती तो वैकुंठप्राप्ती । ऐसे परमेष्ठी बोलिला ।।

संत ज्ञानेश्वर महाराज यांना पालखी सोहळा शनिवारी (ता.६) सकाळी १०.३० च्या सुमारास नीरा (ता. पुरंदर) येथे आला. भाविकांच्या दर्शनानंतर माउलींच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात मोठ्या भक्तिभावात स्नान घालण्यात आले. हजारो भाविक, मानाचे अश्व, भगव्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत आज दुपारी १.३० च्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे शाही नीरा स्नान पार पडले.
नीरा पैलतीरावर दत्त घाटावर माऊलींच्या स्वागतासाठी रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. फुले व रांगोळी यांची आरास आज लक्षवेधी ठरली.
पिंपरे खुर्द येथून सकाळी नऊ वाजता न्याहरी घेऊन पालखी सोहळा नीरेकडे मार्गस्थ झाला. १०.३० वाजण्याच्या सुमारास नीरेत आल्यावर उपस्थित ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. दुपारी पादुका दर्शनासाठी येथील पालखी विसाव्यावर ठेवण्यात आल्या. यावेळी खंडाळा, बारामती, पुरंदर, फलटण तालुक्यातील अनेक गावातील भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. नंतर पादुकांना स्नान घालण्यासाठी नीरा नदीकाठावर आणण्यात आल्या. मोठ्या उत्साहात माऊली माऊलींच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांनी, भाविकांनी पादुकांना नीरा स्नान घातले. यावेळी राजाभाऊ आरफळकर यांच्यासह मानकऱ्यांनी नीरा स्नानासाठी पादुका नेल्या. नीरा स्नान पाहण्यासाठी देखील अनेक भाविकांनी गर्दी केली होती. माऊलींचा हा सोहळा अनेक नेटकऱ्यानी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

01730

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com