नीरेत सर्वपक्षीयांतर्फे तिरंगा यात्रा

नीरेत सर्वपक्षीयांतर्फे तिरंगा यात्रा
Published on

गुळुंचे ता. २३ : सैनिकांच्या सन्मानार्थ नीरा (ता. पुरंदर) येथे नीरा आणि पंचक्रोशीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. येथील छत्रपती शिवाजी चौकातून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. यानंतर बुवासाहेब चौकातून पुढे बाबासाहेब आंबेडकर चौक ते नीरा ग्रामपंचायत कार्यालय अशी नीरा शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदेमातरम्’, जय जवान जय किसान’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या यात्रेमध्ये पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, राधा माने, माधुरी वाडेकर, अनिल चव्हाण, सुजाता दगडे, दत्तात्रेय चव्हाण, नाना जोशी, सचिन लंबाते, उमेश चव्हाण, मंगेश ढमाळ, सुरेंद्र जेधे, राजेश चव्हाण, ॲड. आदेश गिरमे, चंदरराव धायगुडे, राजेंद्र बरकडे, सविता बरकडे, दयानंद चव्हाण, टी. के. जगताप, दयानंद चव्हाण, नदीम सय्यद, सिकंदर शेख, जावेद शेख, मुनीर डांगे, सुदर्शन जैन, अजित सोनवणे, महेश जेधे, तनुजा शहा, नेहा शहा, स्मिता काकडे, रेणुका कोठडिया, वैजयंती शहा, कल्पना पटेल, पल्लवी बोरा, निकिता शहा, संकेता होरा, मोहिनी भिसे, गीता हिरवे, नम्रता कामतकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com