

गुळुंचे, ता.२५ : पुरंदरच्या दक्षिण पूर्व पट्ट्यात दाणादाण उडवली आहे. गुळुंचे, राख, कर्नलवाडी, नीरा, पिंपरे, वाल्हे पाऊस उसंत घेत नसल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या भागातील टोमॅटोचे नुकसान झाले आहे. नवीन लागण केलेल्या कांद्याची रोपे पाण्याखाली गेली आहेत. अतिप्रमाणात पाऊस झाल्यानं, पशुपालकांनी गुरांसाठी केलेली चारा पिके मका, कडवळ ही पिके पाण्याखाली गेली असल्याने, पशुपालकांसाठी चारा आणणे अवघड झाले आहे.
पुरंदरच्या दक्षिण पूर्व पट्ट्यातील गुळुंचे, राख, कर्नलवाडी, नीरा, पिंपरे, वाल्हे आदी भागात व वाड्यावस्त्यांवर सात-आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने व हवामान खात्याचा अंदाज सपशेल चुकल्याने शेतकऱ्यांचे शेतीकामाचे नियोजन कोलमडले. पेरण्यांना जूनमध्ये सुरुवात होत असली तरी पाऊस उसंत घेत नसल्याने या जमिनीच्या मशागतीला वेळ लागणार आहे. त्यामुळे साहजिकच पेरण्या देखील लांबणार आहेत. त्यातच पावसाने शेतात ठिकठिकाणी पाणी साठले आहे. त्यामुळे उभे पीक कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टोमॅटोचे नुकसान झाले असून कांदा पिके पाण्याखाली गेली आहेत. फळ व्यापारी व विक्रेते यांनाही अवकाळीचा फटका बसला आहे. फळांच्या खपाला ब्रेक लागला आहे. पाऊस न उघडल्यास गोदामातील आंबा खराब होण्याची शक्यता आहे.
गेली ४० दिवसांपासून विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली होती. गुळूंचे, कर्नलवाडी, राख, रणवरेवाडी या गावातील उसाला मोठा फटका बसला होता. ऊस, मका, कडवळ पिके वाळून चालली असताना, हा पूर्व मोसमी पाऊस या पिकांसाठी फायदेशीर ठरला होता. मात्र, चारा पिकांना पावसाचा फटका बसत आहे.
- मिलेश निगडे, कृषी मित्र, शेतकरी
यंदा जूनपूर्वीच मॉन्सून बरसत आहे. टोमॅटोचे गावात जवळपास पन्नास एकर तर कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्र आहे. टोमॅटो, कांदा याबरोबरच कोथिंबीर, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर पिकांचे अधिक नुकसान होणार आहे.
- संजय निगडे, प्रगतिशील शेतकरी, गुळुंचे.
01935
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.