एखतपूर येथे पत्रकारास
जाब विचारल्याने मारहाण

एखतपूर येथे पत्रकारास जाब विचारल्याने मारहाण

गराडे, ता. ९ : एखतपूर-चौफुला (ता. पुरंदर) येथे स्कार्पिओची पत्रकाराच्या दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याचा जाब विचारला असता लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी बापू जाधव (रा. सासवड, ता. पुरंदर) इतर अनोखी सहा ते सात जणांवर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पत्रकार संदीप ऊर्फ बाबासाहेब तुकाराम बनसोडे (रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते व त्यांचे मामा शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास पिसर्वे गावाला जात होते. या दरम्यान एखतपूर चौफुलाजवळ गतिरोधक असल्याने गाडीचा वेग कमी केला. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या स्कार्पिओची (क्र. एमएच १४ सीएक्स ६५८७) येऊन जोरात धडकली. याबाबत जाब विचारायला गेलो असता बापू जाधव त्याच्या सोबत इतर अनोळखी सहा ते सात जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली.
याप्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लियाकतअली मुजावर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com