Fri, Sept 22, 2023

पुरंदरमधील दूध संस्थांची
तपासणी करण्याची सूचना
पुरंदरमधील दूध संस्थांची तपासणी करण्याची सूचना
Published on : 31 May 2023, 3:00 am
सासवड शहर, ता. ३१ : पुरंदर तालुक्यातील ३१ दूध उत्पादक संस्थांच्या कामकाजाची चौकशी करण्याची सूचना सहकारमंत्री अतुल सावे यांनी सहकार आयुक्त यांना दिली आहे.
या संस्थामध्ये गैरव्यवहार व नियमितता आहे. त्यामुळे या संस्थांची त्वरित चौकशी होऊन संस्था बरखास्त करण्याची कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी सावे यांच्याकडे केली. त्यानुसार त्यांनी सहकार आयुक्त यांना सदर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून, अहवाल सादर करावा, अशाही सूचना दिली आहे.
दरम्यान, या संस्था स्थापन करताना लागणाऱ्या सभासदांच्या सह्या एकाच व्यक्तीने केल्या आहेत. तसेच बऱ्याच संस्थांचे एकही लिटर दूध नाही, पण इतरांना जबरदस्तीने संस्थेत दूध घालण्याची धमकी दिली जात आहे, अशा तक्रारी केल्या आहेत.