बँक ऑफ इंडियाने जपली परंपरा

बँक ऑफ इंडियाने जपली परंपरा

Published on

सासवड शहर, ता. १६ : आषाढ वारीसाठी सासवड येथून श्री संत सोपानदेव महाराज पालखीचे प्रस्थान होत असताना बँक ऑफ इंडियाने गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ विविध मदत करून सोपानदेव देवस्थानंशी आपले एक वेगळे नाते निर्माण केले आहे. गुरुवारी झालेल्या सोपानदेव पालखी प्रस्थान सोहळ्यात बँकेने साडेसहा हजार गुडदाणीचे, तसेच साडेचार हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करत ही परंपरा आजही जपली आहे.
बँकेचे झोनल मॅनेजर शिबाप्रसाद बिस्वाल, अधिकारी संघटनेचे प्रकाश पत्की, प्रमोद शिंदे, मुकुंद सातपुते व शाखाधिकारी देविका टंडन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पालखी सोहळा प्रमुख ॲड. त्रिगुण गोसावी यांचा यावेळी बँकेतर्फे सन्मान केला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी गिरिराज गडदारे, मंजुश्री निरगुडे, राजेश काळे, गुरुप्रसाद सुतार, नेहा कांबळे, प्रवीणकुमार, विकास जगताप आदींनी मदत केली. दत्तात्रेय शेटे, काळूराम घारे, उल्हास आढाव, प्रदिप तुंगारे, हेमंत ताकवले, अभिमन्यू घोडके, लता बाल, संगीता थोरात, सुरेश गिरमे, सावंत, विलास मोकाशी, रमेश कानडे आदी सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी या प्रसंगी हजर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com