श्री चांगावटेश्वर मंदिरात गर्दी

श्री चांगावटेश्वर मंदिरात गर्दी

सासवड, ता. २१ : सासवड (ता. पुरंदर) येथील पुरातन हेमाडपंती स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेल्या श्री चांगावटेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे सासवड नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांचे हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. यानंतर सासवड परिसरातील शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली. देवस्थानचे वतीने सुनील कामथे यांनी खिचडी वाटप केले. सायंकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे प्रसाद जगताप, देवस्थानचे पुजारी अजय बनसोडकर, शुभांगी न्हालवे, परशुराम देशमुख, माऊली खुडे व इतर सभासद उपस्थित होते.

07325

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com