शेतकऱ्यांना मिळणार ३४ कोटींची दुष्काळी मदत : संजय जगताप

शेतकऱ्यांना मिळणार ३४ कोटींची दुष्काळी मदत : संजय जगताप
Published on

सासवड शहर, ता. ३ : दुष्काळी परीस्थितीमुळे पुरंदर तालुक्यातील १०६ गावांतील जिरायती पिके, बागायत पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले. एकूण ५८ हजार ८० शेतकऱ्यांना ३४ कोटी ५६ लाख ८२ हजार ४२५ रुपयांची सन २०२३ - २४ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळणार आहे, अशी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
याबाबत तालुका कृषी विभाग, पंचायत समिती पुरंदर आणि तहसील कार्यालय पुरंदर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करून आमदार संजय जगताप यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला. यामध्ये २१ हजार २९६.४० हेक्टर जिरायती पिकाखालील ३१ हजार १२० शेतकऱ्यांना १८ कोटी १० लाख १९ हजार ४०० रुपये मिळणार आहेत. तर ४८०० हेक्टर बागायती पिकाखालील क्षेत्राच्या १३ हजार ४८० शेतकऱ्यांना आठ कोटी १६ लाख रुपये नुकसानभरपाई तर तीन हजार ६९१.६९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांच्या नुकसान भरपाईपोटी ११ हजार ४०० फळबागायदार शेतकऱ्यांना आठ कोटी ३० लाख ६३ हजार २५ रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे दरम्यान, भरपाईसाठी कृषी अधिकारी व पुरंदर तहसील कार्यालयाने वेळेत प्रस्ताव सादर केल्याबद्दल जगताप यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com