सासवड येत्या रविवारी 
‘महाविकास’चा मेळावा

सासवड येत्या रविवारी ‘महाविकास’चा मेळावा

सासवड शहर, ता. २५ : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सासवड (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. २८) सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे.
सासवड येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळावर होणार आहे. त्यास बाळासाहेब थोरात, संजय राऊत, सुप्रिया सुळे, सचिन अहीर, संग्राम थोपटे, संजय जगताप, जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुधीर राऊत, सुदाम इंगळे, नंदूकाका जगताप, विजय कोलते, बंडूकाका जगताप, माणिकराव झेंडे पाटील, पुष्कराज जाधव, महादेव टिळेकर, अमोल कामठे, अभिजित जगताप, राहुल गिरमे, संदीप जगताप, रामभाऊ जगताप, बाजीराव कुंजीर, नारायण भिंताडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com