आंबा खरेदीची ६० लाखांची उलाढाल

आंबा खरेदीची ६० लाखांची उलाढाल

सासवड शहर, ता. ११ : सासवड शहरात गेल्या महिनाभरापासून विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आब्यांची आवक झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या आंब्याला मोठी मागणी होती. तसेच कोल्हापूरहूनही आंबा विक्रीसाठी आला होता. यामुळे ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल झाली. अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी आंबा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

सासवड येथे सव्वा डझन देवगड छोट्या आकाराच्या आंबा पेटी ६०० ते ६५०, मोठ्या आकाराचा आंबा ७०० ते ८५०, कर्नाटक हापूस ३०० ते ३५० रुपये तर लालबाग प्रतिकिलो ६० ते ८०, केशर १२० ते २०० रुपये असा बाजारभाव होता. तसेच हापूस, मलिका, तोतापुरी, पायरी, बदाम, केशर या प्रकराचे आंबे विक्रीला होते, असे जिजामाता फळ विक्रेते संघटनेचे अध्यक्ष हरुण बागवान यांनी सांगितले.
एक ते दीड महिन्यांपासून कोकणमधील आंबा अधिक महिना असल्यामुळे लवकर सुरू झाला आहे.
तसेच पुरंदर तालुक्यातील सासवड येथील नागरिकांची केशर हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतात. व स्वस्तातला आंबा उपलब्ध झाल्याने ग्राहक व सासवड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय ग. जगताप यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मनोहर जगताप,राजेंद्र जगताप संभाजी जगताप आदी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील गराडे, हिवरे, काळेवाडी, झेंडेवाडी, जाधववाडी, वनपुरी येथे गेल्या तीन वर्षांमध्ये आंब्याच्या रोपांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असून, भविष्यात तालुक्यातच केशर, हापूससह इतर आंब्यांचे वाण मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी

08722

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com