पुरंदरवर संभाजी ब्रिगेडतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

पुरंदरवर संभाजी ब्रिगेडतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव

गराडे, ता. १५ : किल्ले पुरंदरवर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘छत्रपती संभाजी महाराज विशेष गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात अभिनेते यशराज डिंबळे, पत्रकार संभाजी महामुनी, अमृत भांडवलकर, आदर्श शिक्षक सचिन बोरावके, विजय वाघमारे, अनिल कड, चंद्रकांत शिंदे, संतोष बोरकर, छाया जगदाळे, नंदा कांबळे यांना तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शिवनिश्चल ट्रस्टचे यशवंत गोसावी, उद्योजिका विजया घुले आदींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

काही दिवसापूर्वी किल्ले पुरंदर येथे शरद पवार यांनी भेट दिली आणि त्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यातून आणि लष्कराच्या माध्यमातून किल्ल्याचे स्वरूप बदललेले दिसत आहे. तसेच पुढील काळात किल्ल्याचे आणखी वेगळे चित्र पाहायला मिळेल, असा विश्‍वास आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे, प्रदेश संघटक अजयसिंह भोसले, आमदार संजय जगताप, कोकण विभागाचे सचिन सावंत, सुभाष सावंत, कर्नल महादेव कामठे, संतोष हगवणे, सागरनाना जगताप, अनिल जगताप, राजाभाऊ जगताप, संदीप जगताप, प्रदीप पोमण, तेजराज काकडे, शंभुसिंह राजे निंबाळकर, समीर जाधवराव, रत्नसिंह सावंत, ऊर्मिला काटकर, अभिजित जगताप, यांच्या सह विविध मान्यवर उपस्थित होते. शिव व्याख्याते नीलेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
प्रास्ताविक अजयसिंह सावंत यांनी तर संतोष हगवणे यांनी आभार मानले.


08745

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com