संत मुक्ताबाई तेजोविलीन
दिन सासवड येथे साजरा

संत मुक्ताबाई तेजोविलीन दिन सासवड येथे साजरा

सासवड शहर, ता. २ : संत मुक्ताबाई तेजविलीन दिन मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. यानिमित्त संत मुक्ताबाईंच्या मूर्तीची पहाटे महापूजा करण्यात आली. संत सोपान काका पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १५ च्यावतीने व बाळू काका जगताप व बंटीनाना जगताप यांनी संत सोपानकाका समाधी व परिवार देवतांना चंदन उटी केली.
सकाळी दहा ते बारा यावेळात श्रींसमोर सभामंडपामध्ये पनवेल येथून आलेल्या विलास महाराज गावंड यांचे ‘पूजियेली तापी पूजिला सोमेश्वर’ या संत नामदेवरायांच्या अभंगावर कीर्तन झाले. कीर्तनामध्ये महाराजांनी मुक्ताबाईंचे चरित्र वर्णन करून त्या तापीतीरी कशा प्रकारे गुप्त झाल्या. हा कथा भाग सांगितला. बारा वाजता कीर्तनामधे गुलाल पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर मंदिरामध्ये दिंडी प्रदक्षिणा निघाली. दिंडी संत मुक्ताबाईंच्या मंदिरासमोर आल्यावर निर्याणाचा अभंग म्हणून आरती करण्यात आली. यानंतर दिंडी पुन्हा मंडपात परत आल्यावर विनवणीचे अभंग झाले. त्यानंतर भाविकांनी फुगड्या व इतर खेळ खेळले. मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य विश्वस्त ॲड. त्रिगुण महाराज गोसावी व व्यवस्थापक हिरुकाका गोसावी, चोपदार शिंदे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com