सासवडला विसावली माऊलींची पालखी

सासवडला विसावली माऊलींची पालखी
Published on

सासवड शहर, ता. २ : उत्साही वातावरणात दिवे घाट चढून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सासवडमध्ये विसावली. ही पालखी दोन दिवस सासवड येथे मुक्कामी असून, नगरपालिकेच्यावतीने दोन दिवस मुक्कामाची व्यवस्था केली आहे.

दिवे घाटानंतर पहिला विसावा झेंडेवाडीत झाला. या ठिकाणी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात माऊलींचे भाविकांनी स्वागत केले. यावेळी बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, सोहळा प्रमुख योगिनाथ निरंजन, विश्वस्त राजेंद्र उमाप, भावार्थ डेखळे उपस्थित होते.

यावेळी माजी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, भाजप नेते बाबाराजे जाधवराव, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, हेमंत माहूरकर, ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, झेंडेवाडी सरपंच शरद झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, दिवे येथील सरपंच योगेश काळे, माऊली खटाटे, शिवाजी खटाटे, अमित झेंडे, अजित गोळे, रामदास मेमाणे, सोनाली झेंडे, पुनम झेंडे कौशल्य झेंडे, पोलिस पाटील सारीका झेंडे, संभाजी जगताप, संतोष गिरमे, सोमनाथ कणसे, बाबूराव गोळे आदी उपस्थित होते.

सासवड ते दिवे घाट असे अंतरात चहा, मिठाई, आंबे, केळी, खिचडी, गुडदाणी यांचे वाटप केले तर वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com