शाळा सुट्यांच्या 
निर्णयामुळे नाराजी

शाळा सुट्यांच्या निर्णयामुळे नाराजी

Published on

गराडे, ता. ९ : हवामान खात्याने मंगळवार (ता. ९) दिलेल्या पूर्वसुचनेनुसार अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी दिलेली आहे. पुरंदर तालुक्यात अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. अजुनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे मंगळवारी पाऊस पडला नाही. आवश्यक त्या ठिकाणी शाळा बंद करण्याऐवजी सरसकट शाळा बंद करून हजारो विद्यार्थ्यांचे शासनाने नुकसान केले आहे, अशी खंत श्रीदत्त शिक्षण संस्था सासवडचे अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.