लम्पीमुळे मिरवणुकीची परंपरा खंडित

लम्पीमुळे मिरवणुकीची परंपरा खंडित
Published on

सासवड शहर ता.३ : येथे (ता. पुरंदर) : लम्पी आजारामुळे दत्तात्रेय वढणे यांनी यावर्षी मिरवणूक काढली नाही. १९६१ पासून बैल जोडीच्या मिरवणुकीची परंपरा आहे. ६३ वर्षांच्या परंपरेला लांपिच्या आजारामुळे खंडित करावी लागली. यामुळे ४ लाख रुपये किंमतीच्या बैल जोडीचे घरीच पायावर पाणी घालून, त्याच बरोबर पुरणपोळीचा नैवेद्य देऊन घरच्या महिलांनी बैलाचे औक्षण केले असल्याचे सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कै. रामभाऊ वढणे यांचे बंधू शेतकरी दत्तात्रेय वढणे यांनी सांगितले. तसे सासवड शहरात परिसरातील काही शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्याच्या मिरवणूका काढल्या होत्या.
सासवड येथील भैरवनाथ मंदिरासमोर बैलजोडींचे स्वागत नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदूकाका जगताप यांनी केले.यावेळी ऋषी जगताप, देवस्थानचे पुजारी रामभाऊ भैरवकर, सुनील ताटे श्रीनिवास वढणे सचिन वढणे ॲड. सौरभ वढणे रोहन वढणे, ओम वढणे, श्रीनाथ वढणे, आकाश टिळेकर, अनिकेत टिळेकर, पप्पू कादबाणे व इतर उपस्थित होते.

09688

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com