

गराडे, ता. ३: गुरोळी (ता. पुरंदर) येथे ढोल ताशांच्या गजरात बैलांच्या मिरवणूक काढून बैलपोळा साजरा करण्यात आला. मिरवणुकीत भंडाऱ्याची उधळण करत बैलांची मिरवणूक काढण्यात आली.
पारंपरिक सणाला देखील ग्रामीण भागामध्ये मोठे महत्त्व आहे. यांत्रिकीकरणामुळे सर्वत्र बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शेतकरी अजूनही आर्थिक चक्रात गुरफटलेला असला तरी होणारा हा सण बैलाची मिरवणूक काढत आनंदाने साजरा करण्यात आला. शेतकरी ज्याच्या जीवावर शेत शिवार फुलवायची त्या सर्जा राजाचा हा पोळा सण उत्साहात होणे गरजेचे असल्याचे गुरोळी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष खेडेकर यांनी सांगितले. मिरववुकीत शेतकरी ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग उपस्थितीत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.