

सासवड शहर, ता.३ : सोनेरी (ता पुरंदर) येथील गावात राहणारे तुकाराम दत्तात्रेय काळे यांच्या घरून अंबऋषी मातेचा मुखवटा वाजत गाजत गावातील भैरवनाथ मंदिरात आणण्यात आला. त्यानंतर भैरवनाथ मंदिरात घटस्थापना करण्यात आली. नंतर हा मुखवटा पुन्हा वाजत गाजत अंबऋषी देवीच्या मंदिरात आणण्यात आला. या ठिकाणी मुखवट्याची मंदिर प्रदक्षिणा होऊन नंतर आरती झाली. त्यानंतर घटस्थापना केली, असे पुजारी सोमेश्वर काळे व बाबा काळे यांनी दिली.
यावेळी सोनोरी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष अण्णा काळे, सरपंच संतोष काळे, नितीन काळे, तानाजी काळे, तुकाराम काळे, शरद काळे, लक्ष्मण काळे, ज्ञानदेव काळे, हिरामण काळे, नीलेश काळे, सुभाष भापकर, राजेंद्र काळे, संजय काळे, शंकर काळे, दशरथ काळे, माजी सरपंच सुरेखा रामदास काळे, राष्ट्रवादी विभाग प्रमुख राहुल काळे आदी उपस्थित होते.
09698
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.