सासवड येथे ५ लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

सासवड येथे ५ लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप
Published on

सासवड शहर, ता. १८ : सासवड (ता. पुरंदर) येथील शरद पवार राष्ट्रवादी कार्यालयात पवार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ३१ विद्यार्थ्यांना ५ लाख ७६ हजार १३४ रुपयांच्या शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वाटप माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रवक्ते विजय कोलते, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, महिला तालुका अध्यक्षा गौरी कुंजीर, हेमंत माहूरकर, तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, जिल्हा सचिव दीपाली कवडे, पुरंदर हवेलीचे अध्यक्ष राहुल गिरमे, जिल्हाकार्याध्यक्ष बंडुकाका जगताप, बळवंत गरुड, रामदास जगताप, वामन कामठे, पहिलवान विनोद जगताप, रोहिदास कुदळे, सियाज पानसरे, दत्ता चव्हाण, दीक्षा जरांगे, अमित तांबोळी, अंजली ताकवले आदी उपस्थित होते.
‘‘विद्यार्थ्यांना आई -वडिलांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. तसेच भविष्यात मी समाजासाठी काम करील ही खूणगाठ मनाशी बाळगून काम केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या शिक्षणाचा उपयोग झाला असे म्हणता येईल,’’ असे महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे यांनी सांगितले.
‘‘राजकारण करताना ८० टक्के समाजकारण करणाऱ्या पवार साहेब यांच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे झाली आहेत. ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे,’’ असे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे व शरद पवारसाहेब यांनी पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली हीच आमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिने महत्त्वाची बाब आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. भविष्यात हाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून आमची वाटचाल असेल.
-आरती मुळीक, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी

‘‘यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यानंतर या युगात बहुजन समाजातील तरुणांना व स्त्रियांना शरद पवार साहेबांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच सार्वजनिक जीवनात पुरुषाबरोबर स्त्रिया कुठेही कमी नाहीत म्हणून सर्वांच्या बरोबरीने स्त्रिया राहाव्यात त्यासाठी राजकारणात महिलांसाठी आरक्षण आणले. महिला सक्षमीकरण धोरण राबविले. -जगन्नाथ शेवाळे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com