सासवडच्या फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा

सासवडच्या फार्मसी महाविद्यालयात कार्यशाळा

Published on

सासवड शहर, ता. १० : येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीच्या अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्ताने एक दिवसीय कार्यशाळा आणि मासूम फाउंडेशन यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते.
कार्यशाळेसाठी शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या रेणुका सिंग मर्चंट, स्ट्रॅट्रगिक कल्चर आणि सिक्युरिटी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुषमा भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा. विशाखा गायकवाड मेंबर सेक्रेटरी महिला तक्रार निवारण समिती यांनी केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थिनींना खंबीरपणे आपण कार्यरत असणाऱ्या क्षेत्रात काम करत यश संपादन करावे यासाठी मार्गदर्शन केले. तसेच मासूम फाउंडेशन सासवड यांच्या वतीने महिलांसाठी स्तनाचे आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. स्मिता पवार, प्रा. जयश्री जगताप, कार्यालयीन अधीक्षक विद्या म्हस्के, मासूम फाउंडेशनच्या आरोग्य समितीच्या सोनाली सुतार, श्रीकांत लक्ष्मीशंकर, वैशाली कुंभारकर उपस्थित होते. याप्रसंगी कॅन्सरच्या जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com