पुरंदर विमानतळाविरोधात ६० शेतकऱ्यांचे उपोषण

पुरंदर विमानतळाविरोधात ६० शेतकऱ्यांचे उपोषण
Published on

सासवड शहर ता. ४: सरकार पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ जबरदस्तीने आमच्यावर लादत आहे. विमानतळ पुरंदरच्या विकासाची नांदी आहे, असे शासन भासवीत असले तरी यात बागायती जमिनीवरील अंजीर, सीताफळाच्या बागा नष्ट होणार आहेत. यामुळे आमचे सर्वस्व जात असल्याची व्यथा सासवड (ता. पुरंदर) येथे शुक्रवारी (ता.४) उपोषणास बसलेल्या सात गावांतील ६० शेतकऱ्यांनी बोलून
दाखविली.

यावेळी पारगाव-मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावातील शेतकऱ्यांसह पंचायत समिती माजी शिक्षण विस्तार अधिकारी एस. मेमाणे, पारगावच्या सरपंच ज्योती मेमाणे, उपसरपंच चेतन मेमाणे, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, एखतपुरच्या सरपंच शीतल टिळेकर, कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड, नीरा बाजार समितीचे माजी सभापती महादेव टिळेकर, सतीश कुंभारकर, रामदास होले, किरण होले, मनीष हगवणे, विकास कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, विठ्ठल मेमाणे, लक्ष्मण गायकवाड, देविदास कामठे, कुंभारवळण माजी सरपंच अमोल कामठे, महादेव कुंभारकर, प्रताप कुंभारकर, हरिभाऊ मेमाणे, मच्छिंद्र कुंभारकर, वर्षा मेमाणे, अनिल मेमाणे, पोपट मेमाणे, गौरव जगताप आदी शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत.
दरम्यान, दिवसभरात एकाही शासकीय अधिकाऱ्याने उपोषणास भेट दिली नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्याच्या बरोबर चर्चा केली.

शासनाने हा प्रकल्प लोकांना नको असताना पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. विमानतळामुळे शेतकऱ्यांची मानसिकता बिघडून गेलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी शेतकरी बांधवांची विनंती आहे.
- एस. मेमाणे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती


10689

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com