पुरंदर तालुक्यात भात, वाटाण्यास मागणी
सासवड शहर, ता ३ : पुरंदर तालुक्यात वाटाण्याची मुख्य पीक घेतले जाते. तसेच यावर्षी मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.पेरणीची आमची गडबड आहे. मी वाटाणा व भाताचे बियाणे खरेदी केले असल्याचे भिवरी येथील शेतकरी नारायण कटके यांनी सांगितले.
साासवड येथे सोमवारी बियाणांचा बाजार भरतो. आमच्याकडे ३० टन वाटाणा व २२ टन भाताचे बियाणे विक्री झाले आहे, असे शेती उद्योगाचे विलास जगताप यांनी सांगितले. आमच्याकडे २५ टन वाटाणा व १८ टन भाताचे बियाणांची विक्री झाली असल्याचे विकास ॲग्रो एजन्सीचे सम्राट जगताप यांनी सांगितले.
मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे मी वाटाणा व बाजरी बियाणाची खरेदी केली असल्याचे नितीन पिलाणे व दीपक काकडे यांनी सांगितले.
बियाणे नाव..........दर प्रतिकिलो
वाटाणा ए. पी ३ ..........१४०
वाटाणा, बुंदेल खंड..........१४०
वाटाणा गोल्डन..........२६०
घेवडा (वरुण)..........१२०
घेवडा काश्मिरी (पूर्वा)..........६००
पावटा (अंकुर सीड्स)..........६००
गाजर (सेंच्युरी) ४०० ग्रॅम..........९५०
उडीद..........३००.
मूग..........२५०
इंद्रायणी महाबीज..........१६०० (२५ किलोची बॅग)
बाजरी महिको..........७५०
पुरंदर तालुक्यात साधारण २५०० हेक्टरवर वाटाणा लागवड होत असून यासाठी २५० टन वाटाणा बियाणाची खरेदी होईल तर १२०० हेक्टरवर इंद्रायणी भाताची लागवड केली जाते. यात गराडे,भिवरी, भिवडी, आस्करवाडी, नारायणपूर,नारायणपेठ,काळदरी, देवडी, केतकावळे या गावातून भात पिकाची लागवड केली जाते.भात लागवडीसाठी १० टन बियाणांची खरेदी होईल.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी
10950
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.