जाधववाडी येथे रंगली ‘स्वप्नातील शेती’ स्पर्धा

जाधववाडी येथे रंगली ‘स्वप्नातील शेती’ स्पर्धा

Published on

गराडे ता.३ : जाधववाडी (ता.पुरंदर) येथील अंगणवाडी केंद्र क्र. १ येथे कृषी दिनी ‘माझ्या स्वप्नातील शेती’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत लहान मुलांनी शेतीचे भविष्य आपल्या दृष्टिकोनातून रंगवले.
यावेळी विद्यार्थिनींची योजना सादरीकरण, संवादकौशल्य, आणि ग्रामसंवाद कौशल्य दिसून आले. कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, कृषी महाविद्यालय, पुणे ग्रामीण कृषी कार्यानुभव (रावे) विद्यार्थिनी दिवे ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तेजल जिरवणकर, महेश्वरी जंगम, दिशा लादे, शाल्मली अव्हाळे, ज्ञानेश्वरी बुट्टे, प्रतीक्षा आवटे, किशोरी कुदळे आणि वैष्णवी माने या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत गावातील नागरिकांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com