पुरंदर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
सासवड शहर, ता २० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्यावतीने २१ व २२ जुलै रोजी पुरंदर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये सोमवारी (ता. २१) सकाळी भिवरी, चांबळी, हिवरे हायस्कूल व दुपारी पिसर्वे, पारगाव हायस्कूल येथे, तसेच मंगळवारी (ता. २२) सकाळी मावडी पिंपरी हायस्कूल, कोथळे, दुपारी शिवरी, भिवडी, येवलेवाडी (ता. हवेली) हायस्कूल येथे शालेय विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप, तसेच दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठांना चांगल्या प्रतीच्या छत्र्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कामठे यांनी दिली. यावेळी संतोष जगताप, भानुदास जगताप,सचिन पठारे व संदीप देवकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कामठे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गतिमान नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांनी मला भाजपमध्ये चांगल्या पद्धतीची पदे देऊन पक्षात मला सन्मान मिळवून दिला आहे. यामुळे पक्षात मी सक्षम रीतीने कार्यरत असून, भविष्यातही पक्षासाठी नेटाने काम करील. तसेच, उपमुख्यमंत्री कृतिशील नेतृत्व अजित पवार यांच्यामुळे मला जिल्हा परिषद अध्यक्षपद भुषविता आले. युवकचे अध्यक्ष, तसेच इतर पदे मिळाली. सर्वात महत्त्वाचे अजित पवार यांच्यामुळे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानची स्थापना झाली. आज या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी यांना शिक्षण देण्याचे काम करता येत आहे.’’