सासवडमध्ये ५००० औषध फवारणी पंपांचे वाटप

सासवडमध्ये ५००० औषध फवारणी पंपांचे वाटप

Published on

सासवड शहर, ता २० : शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारावरच अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष तळागळातील सामान्यांसाठी काम आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक कुटुंबच आहे. येथे शेतकरी, कामगार, महिला, शिक्षण, सामाजिक विषय घेऊन सर्व सामान्य माणसासाठी काम केले जाते, असे प्रतिपादन खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.

सासवड (ता.पुरंदर) येथे रविवारी (ता. २०) दादा जाधवराव सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष अमित झेंडे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते खास शेतकरी बांधवांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात ५००० औषध फवारणी बॅटरी पंप व २०० मिल्किंग मशिनचे वाटप तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व सासवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी, महिला व विद्यार्थी यांना साहित्य वाटप संसाधन व्यक्तींना भेटवस्तू वाटप, महिला भजनी मंडळाला भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता झुरंगे, पुरंदर-हवेलीचे विधानसभा अध्यक्ष वामन जगताप, विराज काकडे, गणेश जगताप, प्राची देशमुख, शरद जगताप, राहुल गायकवाड, धोंडिबा कटके, ईश्वर बागमार, गणेश मोरे, अनुराग टिळेकर, प्रकाश फडतरे, रामभाऊ झेंडे, दत्ता राऊत, रेवती कुंजीर, नाना सस्ते, गोरख मांढरे, ऋतुजा धुमाळ, नीता सुभागडे, योगेश फडतरे, भाऊसाहेब कामठे, उमेश जगताप, परवीन पानसरे, नामदेव कुंभारकर, अर्जुन कुंभारकर उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंगेश घोणे यांची जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तपदी तसेच प्रा. जयश्री जगताप यांना पीचडी मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला.


11267

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com