चांगा वटेश्वर मंदिरातील स्थापत्य कलेची पर्यटकांना भुरळ

चांगा वटेश्वर मंदिरातील स्थापत्य कलेची पर्यटकांना भुरळ

Published on

दत्ता भोंगळे : सकाळ वृत्तसेवा
सासवड ते नारायणपूर रस्त्यावरील सासवडपासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीच्या तीरावर हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असणारे श्री चांगा वटेश्वराचे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे. तीस चौकोनी पाषाण स्तंभावर सभामंडप उभा आहे. मंदिरातील पुरातन नयनरम्य कलाकृती, परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांच्या मनात भुरळ घालते.

कऱ्हेच्या तीरावरील चित्तवेधक सौंदर्य मनाला वेड लावते. नयनमनोहर वटवृक्ष, हिरव्यागार लतावेली तसेच मोर, कोकिळा यांसह अनेक पक्ष्यांचा अधिवासाचे मंदिराचा परिसर भाविकांसह पर्यटकांच्या मनाला मोहिनी घालतो. मंदिरातील नंदीचा आकार १५ फूट लांब व ५५ फूट उंच व तीन फूट रुंद असा आहे. मंदिराच्या पूर्वेस दोन्ही बाजूला आकर्षक दीपमाला आहेत.

चांगा वटेश्वराचे मंदिर देवस्थानची मालकी सरदार जयसाहेब पुरंदरे व रजनीसाहेब पुरंदरे यांच्याकडे आहे. तसेच देवस्थानचे पुजारी म्हणून सदाशिव रामचंद्र वडसकर हे वंशपरंपरेने पूजा करीत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात सासवडबद्दल ड्यूक ऑफ बेलिंगटन यांनी पुढील उद्‌गार काढले आहेत. सासवडचे स्वयंभू श्री चांगावटेश्वर देवस्थान कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेला सासवड परिसर म्हणजे महाराष्ट्राचे दडलेले नंदनवनच होय. सासवड गाव व परिसर हा ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्राची ‘बा‍रडोलीच’ समजली जात असत.

सासवड ते किल्ले पुरंदर मार्गावर श्री वटेश्वर हे पुराण सिद्ध जागृत स्वयंभू शिवालय आहे. निसर्गसंपन्न व आल्हाददायक अशी पार्श्वभूमी असलेल्या परिसरात प्राचीन अप्रतिम शिल्पाची साक्ष देत असलेले हे मंदिर अगदी स्वयंभू शंकराची महान पवित्र तपोभूमीच आहे.

सोयी-सुविधा
१. मंदिराबाहेर वाहन पार्किंग व्यवस्था
२. मंदिरजवळच जेवणाची व नाष्ट्याची उत्तम सोय
३. एसटी स्थानक, पीएमपीएल बस
४. शहरात अंर्तगत प्रवासासाठी रिक्षाची व्यवस्था

मंदिराजवळील तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळे
संत सोपानदेव मंदिर, संगमेश्वर मंदिर, श्रीकाळ भैरवनाथ, सासवड आश्रम ट्रस्ट, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, कस्तुरबा आश्रम, कानिफनाथ मंदिर, कोडीतचे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, नारायणपूरचे दत्त मंदिर, केतकावळेचे प्रतिबालाजीमंदिर, पुरंदर किल्ला, मल्हार गड, वीरचे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, जाधवगड, हरेश्वर मंदिर, जेजुरी खंडोबा मंदिर, माळशिरस भुलेश्वर मंदिर.
मदतीसाठी संपर्क : सासवड पोलिस ठाणे : ०२११५-२२२३३३

11316, 11315, 11317, 11319

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com