सासवडला रस्त्याच्या वादातून
महिलेला जातीवाचक शिवीगाळ

सासवडला रस्त्याच्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ

Published on

सासवड, शहर, ता. ११ : सासवड (ता. पुरंदर) येथील गट क्रमांक ७३/७ मधील रस्त्यावरून प्रवेश नाकरणाऱ्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पूजा कमलाकर घोडके यांनी सासवड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
विजय शंकरराव घोडके यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी गोरख भगवा विटकर यांच्याकडून गट क्रमांक ७३/७ मधील दोन गुंठे जागा खरेदी केली होती. त्यावर त्यांचे कुटुंब विटकर परिसरात घर बांधून राहत असून, तेथे त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्याजवळील रहिवासी पूजा विजय धोत्रे आणि जयश्री राजेंद्र धोत्रे आहेत. या जागेतील रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून वादामध्ये आहे. हा वाद तहसील कार्यालय सासवड येथे असून, ३१ जुलै रोजी सकाळी दहा वाजता तहसीलदार विक्रम राजपूत यांनी त्या स्थळ पाहणी केली असता त्यांनी सांगितले की, कोणालाही कायदेशीर रस्ता अडवता येणार नाही. परंतु तहसीलदार निघून गेल्यावर मोहन हरिचंद्र जगताप, किशोर बबन जगताप, प्रल्हाद तुकाराम नागरगोजे, कुणाल प्रल्हाद नागरगोजे, धर्मेंद्र उर्फ काका कुंभारकर या पाच जणांनी महिलेच्या विरोधामध्ये शिवीगाळ केली व पूजा विजय धोत्रे व जयश्री राजेंद्र धोत्रे यांनाही रस्त्यावरून जाण्यास मनाई करीत दमदाटी केली. पीडित कुटुंब भयभीत झाले असून, आरोपीकडून जीवितास धोका असल्याचा दावा केला आहे.
या संदर्भात फिर्याद पूजा घोडके व धोत्रे कुटुंबियांनी ग्रामीण उपअधिक्षक गणेश बिरादार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना अर्ज केला. दरम्यान, पुरंदर तालुक्यात कोणी चुकीचे वागले तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रत्येक अन्यायकारक घटनेला न्याय दिला जाईल, असे सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com