येत्या रविवारी मुख्यमंत्री भिवडीत
सासवड शहर, ता.३१ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंती सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. शासकीय जयंती म्हणून गणली गेलेली ही जयंती रविवारी (ता. ७) पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे पार पडणार असल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष अंकुश जाधव, गंगाराम जाधव, गणपत शितकल, यशवंत ऊर्फ बिट्टू भांडवलकर, अमोल चव्हाण, विकास भांडवलकर, अविनाश जाधव, स्वप्नील चव्हाण, रवींद्र जाधव, विकास भांडवलकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही समाजाच्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी बऱ्याच मार्गी लागल्या आहेत. दिवे येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्मारकाची घोषणा या कार्यक्रमात करून मुख्यमंत्री ही जयंती अजून गोड करतील अशी आशा आहे. तसेच दिवे येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे, राजे उमाजी नाईक यांच्या नावाने शासकीय पुरस्कार जाहीर करावा तसेच , समाजाच्या ४० महापुरुषांचा इतिहास उजेडात आणावा, अशी मागणी देखिल या कार्यक्रमात करणार आहोत, असे दौलत शितोळे यांनी सांगितले.
आंदोलन मनोज जरांगे चालवत नाहीत
सध्या सुरू असलेल्या मनोज जरांगे यांचे हे आंदोलन अन्य कोणी चालवत चालवत आहे. ब्राह्मण समाजातील मुख्यमंत्री झाला हे काही लोकांच्या पचनी पडत नाही. त्यांना हे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कसे जाईल व आपले लोक तेथे कसे बसतील यासाठीचा हा प्रयत्न आहे. हे आंदोलन मनोज जरांगे चालवत नाहीत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे दौलत शितोळे यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

