सासवड- भिवरी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अखेर सुरू
गराडे, ता. ८ : गेल्या वर्षभरापासून सासवड- भिवरी मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताच्या घटनांमध्येही वाढ होत होती. याबाबत १५ दिवसांत दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही, तर कार्यालयास टाळे ठोकण्याची वेळ येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता.
याबाबत ‘सकाळ’नेही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक शहरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, कामठे यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासन कामाला लागले आहे. रस्ते दुरुस्ती होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया चांबळी गावचे शेतकरी व उद्योजक शहाजी कामठे व संजय कामठे यांनी व्यक्त केली.
11863