मानसिक आरोग्य दिनानिमित्त 
सासवड येथे कार्यशाळा

मानसिक आरोग्य दिनानिमित्त सासवड येथे कार्यशाळा

Published on

सासवड शहर, १२ : सासवड (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सेठ गोविंद रघुनाथ साबळे फार्मसी महाविद्यालयात श्री सेठ गोविंद साबळे स्मृतीदिन, ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ आणि व्यावसायिक विकास उपक्रम या त्रिसंधी निमित्ताने ‘ताण व्यवस्थापन : भावनिक स्थैर्याची जडणघडण’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ही कार्यशाळा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात आली. कार्यशाळेचे उद्दिष्ट मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करून, कार्यक्षेत्रातील ताणतणावाचे व्यवस्थापन आणि भावनिक स्थैर्य वाढविण्यासाठी उपयुक्त तंत्रांची ओळख करून देणे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मासूम फाउंडेशनचे सदस्य श्रीकांत लक्ष्मीशंकर, जया नलगे उपस्थित होते. त्यांनी ताणमुक्त जीवनशैली, आत्मसंयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिक आरोग्याच्या संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एम. देशमुख यांनी, तर प्रा. पी. के. म्हस्के यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा जगताप, प्रा. दीपाली जगताप, प्रा. एस. बी. बाठे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. एस. चव्हाण यांनी केले.

Marathi News Esakal
www.esakal.com