‘युवा चेतना दौड’ला सासवडकरांचा प्रतिसाद
सासवड शहर, ता. १२ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा चेतना दिनाचे औचित्य साधून एमईएसच्या इंग्लिश मीडियम स्कूल व योगविद्या केंद्र, सासवड यांनी संयुक्तपणे अखंड सूर्यनमस्कार यज्ञ व मिनी मॅरेथॉनच आयोजन केले होते. या कार्यक्रमास सासवडमध्ये आलेल्या जेंगो सर्कसमधील मार्शल आर्ट सादर करणारे कलाकार लॉरेन बंब संता व हसीना बानू हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दाते पुरस्कृत संगीताच्या तालावर उपस्थितांनी १०८ सूर्यनमस्कार घातले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सांघिक प्रार्थनागीत सादर केले. तसेच, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर पोवाडे व भाषणे सादर केली.
या प्रसंगी योगविद्या केंद्राचे प्रमुख वैद्य. घनश्याम खांडेकर यांनी बलोपासनेचे महत्त्व विशद केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर व पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर युवा चेतना दौडची सुरुवात पालखी मैदानाच्या प्रांगणातून झाली. ही दौड पालखी तळ-कोडीत नाका-अमर चौक-जयप्रकाश चौक-शिवतीर्थ चौकमार्गे पालखी मैदानापर्यंत होती. दोन किलोमीटरच्या या मॅरेथॉनमध्ये पहिली ते नववीचे सुमारे १०० विद्यार्थी, योगविद्या केंद्राचे २५ साधक, प्रशालेतील १५ शिक्षक व पालक सहभागी होते. नीता जगताप व अंकिता जगताप यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. निकिता होले यांनी प्रास्ताविक केले. तर, भाऊसाहेब येळे यांनी सूत्रसंचालन केले. रुचिरा गार्डी यांनी आभार मानले. वंदे मातरम व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसाद वाटपाने गोड शेवट झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

