पुरंदरमध्ये बहुरंगी, बहुढंगी लढती

पुरंदरमध्ये बहुरंगी, बहुढंगी लढती

Published on

दत्ता भोंगळे : सकाळ वृत्तसेवा
सासवड शहर, ता. २७ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात माघारी झाल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक गटांमध्ये बहुरंगी व चौरंगी लढती निश्‍चित झाल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी ३४ तर पंचायत समितीसाठी ६५ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
पंचायत समिती दिवे गणात दिवे गावचे माजी सरपंच अमित झेंडे व दिवे-गराडे गटात त्यांच्या भावजय रूपाली अमोल झेंडे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या गटात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या कन्या दिव्या गंगाराम जगदाळे-शेंडकर या भाजपच्या कमळ चिन्हावर लढत आहेत. तसेच, शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती राजाराम झेंडे या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
नीरा-कोळविहिरे गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण असून, या गटात चौरंगी लढत होत आहे. पंचायत समितीचे माजी सभापती अतुल म्हस्के यांच्या पत्नी भारती म्हस्के शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या कन्या प्राजक्ता दुर्गाडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढत आहेत. भाजपकडून कमळ चिन्हावर सीमा संदीप धायगुडे, तर काँग्रेसकडून हाताचा पंजा चिन्हावर सविता राजेंद्र बरकडे निवडणूक लढवत आहेत.
वीर-भिवडी गट सर्वसाधारणसाठी असल्याने जोरदार बहुरंगी लढत होत आहे. शिवसेनेकडून समीर अरविंद जाधव (धनुष्यबाण), शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख हरिभाऊ कुंडलिक लोळे यांनी भाजपत प्रवेश करून कमळ चिन्हावर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवक तालुका अध्यक्ष पुष्कराज संजय जाधव (घड्याळ), राष्ट्रवादीचे बंडखोर माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार भाऊसाहेब माहुरकर (किटली), अपक्ष अनिल लक्ष्मण धिवार (गॅस सिलिंडर), तर काँग्रेसकडून नवनाथ चंद्रकांत माळवे (हाताचा पंजा) असे उमेदवार मैदानात असून येथे बहुरंगी लढत निश्‍चित झाली आहे.
बेलसर-माळशिरस गट सर्वसाधारणसाठी असल्याने चुरस वाढली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय मारुती झुरंगे यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये घरवापसी करत पंजा चिन्हावर निवडणूक लढवली आहे. राष्ट्रवादीकडून युवक नेतृत्व गौरव विजय कोलते (घड्याळ), शिवसेनेकडून माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य रमेश रामचंद्र इंगळे (धनुष्यबाण), शिवसेना उबाठा गटाकडून कुंभारवळणचे माजी सरपंच अमोल दत्तात्रेय कामठे (मशाल), भाजपकडून अजय कैलास इंगळे (कमळ), आपकडून शहाजी रत्नाकर कोलते (झाडू) असे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे तालुक्याचे लक्ष या गटाकडे लागले आहे.


PNE26V90067

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com