अजितदादांच्या अस्थी आज, उद्या पुरंदरमध्ये

अजितदादांच्या अस्थी   
आज, उद्या पुरंदरमध्ये
Published on

सासवड शहर, ता. २ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या दिवशी बारामतीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच हितचिंतकांना अंतिमदर्शन घेता आले नाही. त्यामुळे त्यांचे अस्ती कलश मंगळवारी (ता. ३) व बुधवारी (ता. ४), दोन दिवस पुरंदर तालुक्यात सर्वसामान्य लोकांच्या दर्शनासाठी आणणार आहेत.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता आस्करवाडी येथून अस्ती कलश दर्शन यात्रेला सुरुवात होईल. तेथून भिवरी, बोपगाव, चांबळी, हिवरे, दिवे, सोनोरी, वनपुरी, उदाचीवाडी फाटा, सिंगापूर, वाघापूर, चौफुला, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, माळशिरस, पोंढे, राजुरी, नायगाव, पिसर्वे, पारगाव, बेलसर, शिवरी व रात्री नऊ वाजता खळद येथ कलश आणणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता जवळार्जुन, मावडी क.प.फाटा, कोळविहिरे, नावळी, राख, कर्नलवाडी फाटा, गुळुंचे, नीरा, पिंपळे फाटा, वाल्हे, जेऊर, मांडकी, लपतळवाडी, वीर, नवलेवाडी, राऊतवाडी, परिंचे, यादववाडी, हरगुडे फाटा, कांबळवाडी, पांगारे, पिंपळे, बोराळवाडी, भिवडी व रात्री आठ वाजता नारायणपूर, असा अस्ती कलशाचा मार्ग असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी दिली. यावेळी पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल गिरमे, शिवाजी साळुंखे व राहुल गायकवाड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com