बाळूमामाच्या पालखीचे
सासवड येथे स्वागत

बाळूमामाच्या पालखीचे सासवड येथे स्वागत

Published on

सासवड शहर, ता. ३ : आळंदी ते आदमापूर पायी पालखीचे सासवड येथील संत सोपान देव मंदिरात उत्साहात स्वागत करण्यात आले. आळंदी ते आदमापूर असे गेली चार वर्ष हा सोहळा चालू आहे. एक फेब्रुवारी रोजी आळंदी येथून या सोहळ्याने आदमापुरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले आणि मंगळवारी (ता. ३) सासवड येथे संत सोपानदेव महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी पालखी रथ विसावला. मंगळवारी संध्याकाळी पुढील प्रवासासाठी हा सोहळा सोपानदेव मंदिरातून मार्गस्थ होईल. सोनोरी गावचे माजी सरपंच बाळासाहेब काळे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत केले.
यावेळी सोहळ्याचे अध्यक्ष संजय कदम, संगीता झेंडे, संगीता माने , मनीषा काळे, शीतल फडतरे, शिवाजी फडतरे, विनोद साखरे, राहुल कदम, संदीप काळे, आदेश केसकर, मल्हार कोळपे, चोपदार दत्तू टुले, गणेश काळे, राजू शिंदे, अण्णा पाटील, परशुराम झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. १४ फेब्रुवारी रोजी हा सोहळा आदमापूर येथे पोहचेल. तेथे बाळूमामाच्या मंदिर दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन पालखी सोहळा येथेच विसावेल. सोहळ्याबरोबर १२० भाविक पायी चालत सामील झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com