...अन्यथा आंदोलन करू
सासवड शहर, ता. २३ : पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असल्यामुळे त्या शासनाने मान्यता देऊन आमची होणारी गैरसोय दूर करावी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा नाइलाजास्तव आंदोलनाचे पाऊल उचलावे लागेल, असे निवेदन पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ यांच्यावतीने तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती संघांचे संस्थापक सरचिटणीस काँ. ज्ञानोबा घोणे यांनी दिली.
यावेळी पुरंदर तालुका अध्यक्ष मनोहर बारभाई,खंडू जाधव, कोषाध्यक्ष विजय इंगळे,सचिव तुकाराम कांबळे,अजित खोमणे, राजू भगत,अनिल भोसले आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पुढीलप्रमाणे; पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १८ फेब्रुवारीला पत्र काढून सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून रुपये ३७५० रुपये मिळणाऱ्या वेतनाच्या व्यतिरिक्त राहणीमान भत्ता देण्याचा आदेश काढलेला असताना तालुक्यात त्याची अंलबजावणी काटेकोर झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे थकीत पगार मिळणे गरजेचे असून पुरंदर तालुक्यासाठी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन्ही महिन्याचे मिळून २२ लाख ४७ हजार २१० एवढी रक्कम मंजूर होऊन आली असताना ९३ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वाटप होत नाही. कर्मचाऱ्यांना रात्री,अपरात्री,पाऊस वाऱ्यामध्ये काम करावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांचा १५ लाख रुपयांचा विमा उतरणे गरजेचे आहे. राज्यपाल यांच्या मान्यतेने ३१ मार्च २०२०मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी आदेश काढून २३ हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

