सासवडच्या विद्यार्थ्यांचे
पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये यश

सासवडच्या विद्यार्थ्यांचे पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये यश

Published on

सासवड शहर, ता. २५ : पुणे येथे आयोजित इंडो- यूएस आंतरराष्ट्रीय परिषदेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवडच्या (ता. पुरंदर) एस.वाय. एम.फार्मच्या (फार्माकोलॉजी विभाग) प्रज्वल पतंगे आणि आदित्य मोहिते यांनी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, एस.वाय. एम.फार्मच्या फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या विद्यार्थिनी सुषमा घामटे आणि क्षितिजा चव्हाण यांनी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
ही स्पर्धा इंडो- यूएस आंतरराष्ट्रीय परिषद व रिसर्च सोल्यूशन्स यांच्या वतीने एंजेल कॉलेज ऑफ फार्मसी विभा आयुर्वेद युनिटेक रिसर्च सोल्यूशन्स आणि वायडा संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने आयोजित केली होती. या यशासाठी डॉ. प्रज्ञा जगताप (फार्मॅकोलॉजी विभागप्रमुख) तसेच, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com