पुरंदर विद्यासंकुलात ‘वृक्ष माझा सखा’ उपक्रम

पुरंदर विद्यासंकुलात ‘वृक्ष माझा सखा’ उपक्रम

Published on

सासवड शहर, ता. २७ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सासवड येथे शुक्रवारी (ता. २७) महाराष्ट्राचे ज्येष्ठ लेखक व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांना प्रसिद्ध लेखक व कवींची ओळख व्हावी म्हणून पर्यावरणाशी संबंधित ‘वृक्ष माझा सखा’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्या संकुलातील १४८ झाडांना प्रसिद्ध लेखक व कवी यांची नावे देण्यात आली, हे कार्य गटाने केले गेले. त्यामुळे त्या झाडाची देखभाल करण्याची जबाबदारी त्या ग्रुपवर देण्यात आली. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मयाची ओळख व्हावी म्हणून मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली.

प्रमुख पाहुण्या सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सासवडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यशश्री भालेराव यांनी मराठी भाषा इतर भाषेपेक्षा वेगळी कशी आहे ते सांगितले व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन केले. वनपाल हेमंत मोरे, माधुरी जगताप, वनरक्षक रेश्मा गायकवाड यांनी हरित सेनेविषयी मार्गदर्शन केले. श्रुतिका विभाड व शर्वरी टेकवडे या विद्यार्थ्यानी मराठीची थोरवी आपल्या भाषणातून व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य इस्माईल सय्यद होते, प्रा. राजेंद्र निचळ, पर्यवेक्षक विजय खोमणे, राजाभाऊ कदम, रविन जगदाळे, संजय पाटील आदी उपस्थित होते.
‘वृक्ष माझा सखा’ या उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. बालाजी परतवाड यांनी केले. यामध्ये अकरावी वर्गातील विद्यार्थी सहभागी होते. त्यात ओम होले, तुषार चव्हाण, प्रज्ज्वल खोमणे, ओम कुंभभिरकर, दामिनी पवार, साक्षी पवार, ज्ञानेश्वरी खेसे, अक्षरा खेडेकर, अनुष्का मगर, स्नेहल नवले, प्रियांका भोसले, योगिता कामठे, आर्या गायकवाड या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रा. भानुदास कटके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कैलास गवळी यांनी आभार केले.

सासवड (ता. पुरंदर) : मराठी वाङ्मय मंडळाच्या फलकाचे उद्‍घाटन करताना वनाधिकारी यशश्री भालेराव व मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com