वाघापुरात शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे

वाघापुरात शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे

Published on

गराडे, ता. ५ : वाघापूर (ता. पुरंदर) येथे बुधवारी (ता. ४) शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शेतकऱ्यांना माती परीक्षण व सेंद्रिय कर्ब वाढविणे, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अफार्म संस्था आणि एचएसबीसी यांच्या सहकार्याने सहा गावांत राबविण्यात येत असलेल्या ‘हवामान आधारित उपजीविका सक्षमीकरण प्रकल्प’ हा प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी अफार्मचे कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, संचालक शांताराम साकोरे, अफार्म मानव संसाधन व्यवस्थापक वरिष्ठ छाया देगडे, उपकृषी अधिकारी सचिन जगताप, मृदा विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,मांजरीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रीती देशमुख, जाधववाडीतील अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप दळवी, संस्थापक अग्रहिता (बांबू लागवड) रणजित गुळवे, हिंदुस्थान फिड्सचे तांत्रिक अधिकारी दर्शन गावडे, ग्रामसेविका नलिनी धोऊत्रे, रेश्मा एक्के, जिल्हा परिषद सदस्या रूपाली झेंडे उपस्थित होत्या.

याशिवाय सोनोरी, उदाचीवाडी, वनपुरी, गुरोळी व सिंगापूर या गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट सदस्य तसेच विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी आणि अफार्म संस्थेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपविभागीय कृषी अधिकारी जगताप यांनी शासनाच्या पूरक योजना, विशेषतः पीएमएफबीवायचा लाभ घ्यावा तसेच कृषी विभागाचे महा विस्तार एआय ॲप डाउनलोड करून विविध कृषी समस्यांबाबत शेतकऱ्यांनी माहिती सांगितली.

यावेळी अफार्मचे अमितकुमार मेत्रे, शेतकरी वनपुरीचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर, सिंगापूर गावचे सरपंच विशाल लवांडे, प्रगतिशील महिला शेतकरी अश्विनी कुंभारकर, सोनोरीचे माजी सरपंच संतोष काळे, सुशीला खेडकर यांनी अनुभव कथन केले.
दरम्यान, मेळाव्यात कृषी तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, जल व मृदा संवर्धन, पूरक उद्योग याविषयी माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते. आभार अफार्मचे प्रकल्प व्यवस्थापक सावता दुधाळ यांनी मानले.

12682

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com