भैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अजय जगताप
सासवड शहर, ता. ९ : सासवड (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे चैत्री उत्सव कमिटीची वार्षिक बैठक होऊन यात चैत्री उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी अजय गणपत जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी नितीन वसंतराव भोंगळे यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडसभेच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुधाकर गिरमे हे होते. येथे श्री काळभैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाची रविवारी (ता. ८) बैठक झाली. ही बैठक श्री काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप व माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यात चैत्री यात्रेत होणाऱ्या कार्यक्रमाबरोबरच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. तसेच मागील वर्षी झालेल्या उत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय जगताप, ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, सुधाकर गिरमे, उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रकाश जगताप, कैलास कावडेबुवा, गिरीगोसावी महाराज, संग्राम जगताप, रामभाऊ इनामके आदी उपस्थित होते. नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार संजय जगताप व माजी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
रवींद्रपंत जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर ट्रस्टचे सचिव विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले.
12708, 12709
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

