कोडीत बुद्रुकमध्ये स्वच्छतेचा जागर

कोडीत बुद्रुकमध्ये स्वच्छतेचा जागर
Published on

गराडे, ता. ३० : कोडीत (ता. पुरंदर) येथील ग्रामस्थांनी ‘आपले गाव स्वच्छ व सुंदर गाव’ या संकल्पनेतून तालुक्यात सर्वात स्वच्छ व सुंदर गाव घडविण्याचा निर्धार केला आहे. ग्रामपंचायत, युवक मंडळ, महिला बचत गट व सर्व ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून दर रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे.
कोडीत येथे दर रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रमदान केले जाते. रविवारी (ता. २९) नंदी चौक, मारुती मंदिर आणि अंगणवाडी परिसरात स्वच्छता करून कचरा संकलन करण्यात आले. गावातील नाल्यांची सफाई करण्यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
गावात आता घरोघरी कचरा संकलन व्यवस्था कार्यान्वित झाली असून, कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच देण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांच्या या सक्रिय सहभागामुळे गावाचे रूप पालटत असून, स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखावी, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

12864

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com