

सासवड शहर, ता. ८ : सासवड येथे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘प्रोफेशनल एटीकेट, ग्रुप डिस्कशन व मॉक इंटरव्ह्यू’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम ६ ते ८ एप्रिल यादरम्यान पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिष्टाचार, प्रभावी संवाद कौशल्य, गटचर्चा तंत्र आणि मुलाखत कौशल्य विकसित करणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जीटीटी फाउंडेशनचे प्रशिक्षक अजय मदाळे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, प्रत्यक्ष गटचर्चा व मुलाखतीचे प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. अंकिता जवळकर व डॉ. गणेश निगडे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.