

सासवड शहर, ता. १० : सासवड येथील संजीवनी फाउंडेशनतर्फे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य क्रीडारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, त्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या गुणवंतांचा गौरव राष्ट्रीय क्रीडादिनी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी थाटात करण्यात येतो. यंदा या उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप आणि सचिव अर्चना जगताप यांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या मानाच्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, श्रीफळ, पगडी आणि उपरणे असे असणार आहे.
खेळाडू, प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा पत्रकार, क्रीडा लेखक, पालक आणि संघटक अशा एकूण चौदा विविध प्रवर्गांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या संस्थाचालकांसह लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही यात गौरव होणार आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळून राज्यातील क्रीडा चळवळ अधिक मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे.
या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी पुढील गुगल लिंक वापरावी.
https://forms.gle/hKymm5rf5jyomypX9
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.