वाहनाच्या धडकेत गुनाटला बिबट्या ठार

वाहनाच्या धडकेत गुनाटला बिबट्या ठार
Published on

गुनाट, ता.२७ : गुनाट (ता. शिरूर) येथे फंड वस्तीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. २६) मध्यरात्री घडली. गुनाट परिसरात तीन चार बिबट्यांचा वावर आहे. सायंकाळच्या सुमारास शेताच्या बांधावर, तर कधी चासकमान कालव्यावर या बिबट्यांचा बिनधास्तपणे वावर शेतकऱ्यांना पाहायला मिळतो.
पिंजऱ्यांच्या कमतरतेमुळे बिबट्या पकडले जात नसल्याने या परिसरातील शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, वनरक्षक एस. एम. भुतेकर, वनपाल जे. आर. म्हेत्रे, वनकर्मचारी नवनाथ गांधले व ग्रामस्थ यांच्या उपस्थित मृत बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शिरूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले आहे, अशी माहिती माहिती वनरक्षक एस. एस. खेडकर यांनी दिली.
बिबट्याला पकडण्यासाठी कायमस्वरूपी दोन तरी पिंजरे वनविभागाने लावावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थ संतोष भगत यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com