प्रियांका लटांबळे यांना पीएच. डी. प्रदान
गुनाट, ता. १७ : शेतकरी योजनांवर महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल (पिंपळनेर, ता. पारनेर) येथील डॉ. प्रियांका सुनील लटांबळे यांना कृषी विस्तार शिक्षण विभागातून डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे रविवारी (ता. १५) ३९ वा दीक्षान्त समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री, कृषिमंत्री, राज्याचे राज्यपाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान डॉ. प्रियांका लटांबळे यांनी ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांवरील परिणाम’ या विषयावर संशोधन करत प्रबंध सादर केला. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभार्थी शेतकऱ्यांवर झालेला परिणाम सखोलपणे अभ्यासला आहे. या संशोधनासाठी त्यांना मा. डॉ. एस. बी. भणगे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रियांकाचे आई-वडील शिक्षक असून त्यांनीही तिला या संशोधनासाठी पाठिंबा दिला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी : डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्यानंतर आई-वडिलांसोबत डॉ. प्रियांका लटांबळे.

