शनिवार ते सोमवार सुट्टीतही करता येणार दस्त नोंदणी
इंदापूर, ता. २५ : शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस सरकारी कार्यालयांना सुट्ट्या असल्या तरी दुय्यम निबंधक कार्यालये या सुट्ट्यांमध्ये सुरूच राहणार आहेत. त्यामुळे जमिनीचे खरेदी-विक्रीचे दस्त नोंदणीचे व्यवहार सुरळितपणे सुरू राहतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर येथील दुय्यम निबंधक विनायक तपस्वी यांनी केले. यंदा एक एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर बदलणार आहेत. हे दर वाढण्यापूर्वी दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.
येत्या शनिवारी (ता. २९) चौथा शनिवार, रविवारी (ता. ३०) गुढीपाडवा, व सोमवारी (ता. ३१) रमझान ईद आणि आर्थिक वर्षाचा शेवट यामुळे सरकारी कार्यालयांना सलग तीन दिवस सुट्ट्या आहेत. मात्र तरी दुय्यम निबंधक कार्यालये यादरम्यान सुरूच राहणार आहेत. तर यंदा एक एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर बदलणार असून, हे दर वाढण्यापूर्वी दस्त नोंदणीकरून आर्थिक फायदा साधता येणार आहे. यामुळे रेडिरेकनरच्या दरात बदल होण्यापूर्वी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणीच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता विचारात घेता तसेच सलग सुट्ट्यांमध्ये दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या पक्षकारांची गैरसोय होऊ नये, यामुळे जनतेच्या सोयीसाठी ही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. त्यानुसार वरील तीनही दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

