

इंदापूर, ता.२६ : इंदापूर शहरात आणि परिसरात शनिवारी (ता.२६) दुपारी प्रखर उष्णतेनंतर संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे काही भागांत वादळी वाऱ्यांमुळे तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
इंदापूर शहरात शनिवारी दुपारी पाऱ्याने ४० अंशाची पातळी ओलांडलेली असताना दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. रस्ते बाजारपेठा ओस पडल्या होत्या. सायंकाळी ऊन कमी झाल्यानंतर नागरिक बाहेर पडू लागलेल्या असतानाच संध्याकाळी सातच्या दरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळाने हवेतील उष्णतेची जागा घेतली आणि अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली. हवेत गारवा निर्माण झालेला असताना दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.अवकाळी वादळ व पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः आंबा, कांदा, गहू, हरभरा आणि मका या पिकांना फटका बसणार आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
05219
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.