ऐतिहासिक चांदशहावली बाबा दर्ग्याची भिंत कोसळली

ऐतिहासिक चांदशहावली बाबा दर्ग्याची भिंत कोसळली
Published on

इंदापूर, ता. २४ : इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी संवर्धन करणे व हजरत चांदशहावलीबाबा दर्गा सुशोभीकरण यांचे काम सुरू असून हे काम करीत असताना संबंधित ठेकेदाराकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली नसल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक चांदशहावलीबाबा दर्ग्याची भिंत कोसळली यामुळे कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुशोभीकरण करताना योग्य ती खबरदारी घेत काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

इंदापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांची गढी संवर्धन व हजरत चांदशहावलीबाबा दर्गा सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये केले होते. यामध्ये हजरत चांदशहावलीबाबा दर्गा सुशोभीकरण मधून दर्गा छतास गळती प्रतिबंधक उपाय योजना करणे, दर्ग्याच्या बाहेरील बाजूस प्लास्टर करणे, छतास जीआय शीट बसविणे, दर्गाच्या पाया तसेच रॅम्पला सोलिंग करणे, कॉंक्रीट बेड करणे, पायऱ्यांचे दगडी बांधकामासह पाँइटिंग करणे, दरगाहच्या आतील बाजूस तंदूर दगड फरशी बसविणे, लोखंडी जाळी बसविणे, दरवाजे बसविणे, खिडक्या बसविणे, खिडक्यांना ग्रील बसविणे, दर्ग्याच्या बाहेरील बाजूस रंगकाम करणे, फरशीकाम करणे, महिला दरगाहसाठी आर.सी.सी. फ्रेमवर्क करणे, लाकडीकामास मेलॅमाईन पॉलिश करणे आदी कामे करण्यात येणार आहे.
सध्या या कामासाठी खोदकाम सुरू आहे मात्र हे करत असताना ऐतिहासिक दर्ग्याच्या बाबत योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याने त्यातच पावसाने हजेरी लावल्याने दर्ग्याच्या उजव्या बाजूकडील भिंत कोसळल्याने ऐतिहासिक दर्ग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच ऐतिहासिक मालोजीराजे गढीच्या कामाच्या दर्जा तसेच नियोजनाच्या बाबतही वारंवार तक्रारी पुढे येत आहेत. यामुळे संबंधित ठेकेदार मनमानी करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे. यामुळे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडून योग्य त्या उपाययोजना करून दर्गा सुशोभीकरणाचे तसेच शिवभक्तांच्या मागणीप्रमाणे गढीच्या अतिक्रमण व इतर प्रश्‍नांबाबत उपाययोजना करून पुढील काम करण्याची मागणी होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले गढी तसेच या ठिकाणी असलेला चांदशाहवलीबाबा दर्गा या ऐतिहासिक वास्तू असून यांचे संवर्धन व सुशोभीकरण करत असताना ऐतिहासिक वास्तूला धोका होणार नाही याची संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
- आझाद पठाण, हमीद आतार, महादेव चव्हाण

दर्गा सुशोभीकरण काम सुरू आहे. यंदा पावसाने लवकर हजेरी लावली यामध्ये गेली गेली पाच दिवस काही वेळा मुसळधार तर काही वेळा संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे दर्गा सुशोभीकरण कामासाठी केलेल्या खोदकामामुळे उजव्या बाजूची भिंत कोसळली असून याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना करून तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. ऐतिहासिक वास्तूला काहीही होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.
- दीपक भोसले, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागून इंदापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com