

इंदापूर, ता.२४ : मागील चार दिवसांपासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील जिल्ह्याच्या विविध भागासह इंदापूर तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षीप्रमाणे मे महिन्यात खालावणारी उजनी धरणाची पाणी पातळी यंदा स्थिर राहील अशी शक्यता दिसत आहे.
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर साठी जीवनदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मागील तीन चार दिवस सतत पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे. गेल्या तीन- चार दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कधी मुसळधार तर कधी संततधार स्थिती राहिलेली आहे आणि यामुळे गेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये २ टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे.
सध्या उजनी धरणामध्ये एकूण ५३ पूर्णांक २५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस १९ पूर्णांक ४३ टक्के इतका आहे. मायनस मध्ये असलेले उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी आणखी १० पूर्णांक ४१ टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे.
सध्या जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. अजून हे पाणी धरण साठवण क्षमतेत जमा झालेले नाही. सद्यःस्थितीला उजनी धरणात येणारा विसर्ग हा शून्य आहे. तरीही पाणी साठ्यात दोन टीएमसीने वाढ झालेली आहे. दरम्यान, सहा जूनला महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तत्पूर्वी सद्यःस्थिती पाहता मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात सर्वच भागात पावसाने जोर धरलेला आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सुरू होऊ शकते आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी देखील झपाट्याने वाढू शकते.शेतकऱ्यांसाठी ही दिलासा देणारी बाब असेल.
---
उजनी धरणाची २४ मे २०२५ पाण्याची स्थिती..
एकूण पाणी पातळी........४८९.४२० मीटर
एकूण पाणीसाठा........१५०७.९९ घन मीटर (५३.२५ टीएमसी)
उपयुक्त जलसाठा........(-२९४.८२) घन मीटर (-१०.४१ टीएमसी) -
टक्केवारी........(-१९.४३टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.