इंदापूर शहरासह तालुक्याला विकासाकडे नेणारे नेतृत्व

इंदापूर शहरासह तालुक्याला विकासाकडे नेणारे नेतृत्व
Published on

भीमा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम, उजनी धरणाचे मोठे पाणलोट क्षेत्र आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्वेस शेवटचा तालुका म्हणून इंदापूर तालुक्याची ओळख. इंदापूरचा समावेश इतिहास काळात वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या जहागिरीमध्‍ये होता. अशा अशा या ऐतिहासिक इंदापूर शहर व तालुक्याचा गेल्या दहा वर्षात चेहरा मोहरा बदलत विकासाकडे नेणारे नेतृत्व राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
- मा. संदीप धापटे,
सचिव,भगवानराव भरणे नागरी सहकारी पतसंस्था, इंदापूर

इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घर करून बसलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे इंदापूर तालुक्याचे लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मंत्री, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांचे मामा म्हणून परिचित असलेले, विकासाचा ध्यास घेतलेले दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे होय.
एक जून १९६८ मध्ये इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या दत्तात्रेय (मामा) भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते इंदापूर तालुक्याचे आमदार ते राज्याच्या सात खात्यांचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री पदापर्यंतचा राजकीय प्रवास आणि त्याचवेळी साधलेली विकासाची वेळ आजच्या तरुणपिढीसाठी निश्‍चित प्रेरणादायी आहे.
बालपणापासूनच निष्ठेने, तत्परतेने आपले काम पूर्ण करीत असताना ज्या कारखान्याला आपल्या शेतातील ऊस जातो त्या कारखान्याचे संचालक होण्याचे स्वप्न मामांनी बघितले आणि सत्यात उतरवलेही. त्यानंतर १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवून बँकेवर संचालक म्हणून निवडून गेले. २००१ ते २००२ या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाची निवडणूक लढवीत सन २००२ ते २००५ या कालावधीत कारखान्याचे अध्यक्ष पद भूषविले.याकाळात दांडगा जनसंपर्क ठेवला. त्यानंतर दत्तात्रेय भरणे यांच्या रूपाने इंदापूर तालुक्याला पहिल्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली. २०१२ पासून अडीच वर्षे दत्तामामांनी अतिशय सखोल अभ्यास करून जिल्हा परिषदेच्या मार्फत राबवली जाणारी विविध विकास कामे, वैयक्तिक

विविध योजनेमधून अनेकांना लाभ
लाभाच्या योजना इंदापूर तालुक्यात घरा घरात पोहचवल्या.यावेळी अनेक योजना यशस्वी करत असताना गरीब आणि गरजू अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त आदी घटकांना विविध योजनेमधून लाभ मिळवून दिला. या कामामुळे मामांनी आपले स्थान घराघरांतील लोकांच्या मनात निर्माण केले. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवीत मामा विधानसभेत पोहचले.

प्रत्येक रविवारी मामांच्या घरी जनता दरबार
पहिल्यांदाच विधानसभेमध्ये गेल्यानंतर मामांनी विविध योजनांचा अभ्यास करत आपल्या मतदारसंघात नेमके काय करावे लागेल यांचे ज्ञान अवगत केले. त्यामुळेच आपल्या पंचवार्षिक कालखंडात तालुक्यामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात मामांना यश आले. या कालावधीमध्ये युतीचे सरकार होते. तरीही विरोधी पक्षातील आमदार असूनही मामांनी चमकदार कामगिरी केली. प्रत्येक रविवारी मामांच्या घरी मिनी जनता दरबार भरतो. आलेल्या प्रत्येक व्यक्तीची अडचण काय आहे? हे समजून घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचा मामांचा स्वभाव सर्वसामान्य नागरिकांना मोहात पाडल्याशिवाय राहत नाही. भेटायला आलेल्या व्यक्तीला समाधानी भावनेनेच मामा परत पाठवतात, कधी कधी खूप गर्दी असली तर समोरच्या व्यक्तीशी बोलत असतानाच त्यांचे लक्ष दाराच्या बाहेर असलेल्या व्यक्तीवर असते. तालुक्यात विविध उद्घाटने, भूमिपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आदींची रेलचेल, असताना ‘त्या’ शेवटच्या व्यक्तीचे काम मामांच्या आठवणीत असते. स्वतः त्या व्यक्ती पर्यंत जाऊन त्याची विचारपूस करण्यास मामा कुठेही कमी पडत नाहीत. जनता दरबारात मामा झपाटल्यासारखे वावरत असतात. एखादी महिला भगिनी दरबारात आली तर प्राधान्याने तिची विचारपूस होते, तिचे प्रश्न सोडवले जातात.


पवार कुटुंबाने दिली मंत्रिपदाची संधी
आपल्याकडे आलेल्या शेवटच्या व्यक्तीचे काम समजून घेतल्याशिवाय मामा पुढच्या कार्यक्रमाला जात नाहीत. त्यांच्या या कामाची पोहोच पावती म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने दुसऱ्यांदा भरणे मामांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालून मामांच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब केले. पवार कुटुंबाने मंत्रिपदाची दिली संधी. पक्षनिष्ठा व केलेल्या प्रामाणिकपणाच्या कामाची पोचपावती दिली. भरणे यांना राज्याच्या सात खात्यांचे राज्यमंत्री केले. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, समान्यप्रशासन व सोलापूरचे पालकमंत्री पद दिले. या काळात मामांनी २ हजार २०० कोटी रुपयांचा विकासनिधी तालुक्याच्या विकासासाठी आणला. त्यानंतर २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मामांनी केलेली विकास कामे आणि जनतेच्या मनामध्ये मिळवलेली जागा यामुळे विजयाची हॅट्रिक साधली.आणि तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी दिली यासह वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही मामा सध्या काम पाहत आहे हे करत असताना तालुक्याचा चौफेर विकास साधला जाईल याकडे मामांचे विशेष लक्ष असते.


अधिकाऱ्यांवर मामांचे नैतिक वजन
मामांच्या विजया मामांच्या या विधानसभेतील हॅट्रिक साधनेच्या मागे मामा आज कॅबिनेट मंत्री आहेत मात्र मंत्रिपदाची ऐट मामांनी कधीच मारली नाही. मामा मंत्री असूनही मनं येईल तिथे थांबायचे. रस्त्यातच कार्यकर्त्यांमध्ये मामा कुठे चहाचा घोट घेत तर कुठे पेरुची चव चाखत सर्वसामान्यांमध्ये रमत असत. तसेच कधी बालगोपाळांमध्ये रमून क्रिकेट, आट्यापट्या खेळत सायकलवर स्वार होत, असे आहेत मामा ! असे असेल तरी विधानसभेत जनतेच्या हिताचे प्रश्न मांडत ते सोडविण्यासाठी उपाय योजना शोधत असतात, अधिकाऱ्यांवर मामांचे नैतिक वजन आहे. त्यामुळे अडचण कशी सोडवायची कोणत्या योजनेत कोणते काम बसवायचे याचा नेमकेपणा अचूकपणा मामांमुळे अधिकार वर्गात येतो. यामुळेच इंदापूर तालुक्यात विकासगंगा वाहत आहे.


मुलखावेगळं अजब गजब रसायन
तालुक्यात मामांनी रस्त्याचे जाळे विणले, अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध केली. मामा नव उद्योजकांच्या शुभारंभाला जातात आवर्जून युवकांना जवळ बोलावून कोणत्या क्षेत्रात करिअर करणार असा सवाल करतात. व त्यांना मार्गदर्शनही करीत असतात. कधी कधी मामा शाळेत जाऊन लहान मुलांना शिकवतात. त्यांच्या तासाला लहान मुलांनाही मजा येते. असे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे एक मुलखावेगळं अजब गजब रसायन आहे. लहानांपासून थोरांपर्यंत चाहता वर्ग वाढवत आहेत. अशा दिलखुलास व्यक्तिमत्त्वास उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा!


मामांचे बंधू व शेती व्यवसायातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, इंदापूर शहरातील अर्थव्यवस्थेला गती देणारी भगवानराव भरणे नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच इफ्को नवी दिल्लीचे सदस्य मा.मधुकर (मामा) भरणे यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..

शब्दांकन : संतोष आटोळे

05417, 05418, 05419
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com